टाइगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या बागी २ या चित्रपटात ९० च्या दशकातील एक सुपरहीट गाणे असणार आहे. हे गाणे धक धक गर्ल माधुरी दीक्षितवर चित्रित झाले होते. तेजाब चित्रपटातील तिचे सुपरहीट गाणे एक दो तीन या गाण्यावर आता जॅकलिन थिरकणार आहे. या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य आणि अहमद खान या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करत आहेत.जॅकलिनसाठी हे गाणे महत्त्वपूर्ण ठरेल. कारण ते गाणे सुप्रसिद्ध आहे आणि माधुरीच्या नृत्याने त्याला बहार आणली होती. आता यावर जॅकलिनचा डान्स किती धमाल आणतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

#LokmatNews

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews